National News

अर्धापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन हे क्टरी 50 हजार मदत द्यावी- अर्धापूर भाजपाची मुख ्यमंत्र्याकडे मागणी…!

अर्धापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार मदत द्यावी- अर्धापूर भाजपाची मुख्यमंत्र्याकडे मागणी…!

अर्धापूर ( शेख जुबेर) तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले शंभर टक्के वाया गेले आहे. तरी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे. अशी मागणी अर्धापूर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्याला प्रचंड आधाराची गरज आहे.

अर्धापुर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी अर्धापूर भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले, तालुका सरचिटणीस अवधूत कदम, शहराध्यक्ष विलास साबळे, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, माजी प.स.सदस्य रामराव धात्रक, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणकर, देवीदास कल्याणकर, ता.उपाध्यक्ष जगन कल्याणकर, कृष्णा पाटील इंगोले, अमोल कपाटे, प्रभू कपाटे, कुश भांगे पाटील, अँड.बालाजी कदम, निलेश आपनगिरे, आकाश देशमुख, बाबुराव क्षीरसागर, साई बारसे आदींसह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

%d bloggers like this: