Nanded News

नांदेड:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक मंगळवारपासून तीन दिवस नांदेड दौर्‍यावर

नांदेड ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक श्री अविनाश आदिक आणि श्री रवींद्र तौर हे पक्षनिरीक्षक दि. 20, 21 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. तर दि. 22 ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षनिरीक्षक श्री. अविनाश आदिक आणि श्री. रवींद्र तौर हे दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नांदेड येथे मुक्कामाला येणार असून शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. दि. 20 ऑक्टोबर मंगळवार रोजी कंधार येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 10 ते 11.30 या वेळेत लोहा आणि कंधार तालुक्यातील पदाधिकार्‍यांची व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. तसेच याच दिवशी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात 12.30 ते 2 या वेळेत मुखेड तालुक्यातील कार्यकर्तेे, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील.

मुखेड येथून निघाल्यानंतर देगलूर येथे शासकीय विश्रामगृहात 4 ते 5.30 या वेळात कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात 6.30 ते 7 या वेळेत नायगाव आणि बिलोली या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. दि. 21 ऑक्टोबर रोजी बुधवारी नांदेड येथून हदगावकडे ते रवाना होतील. हदगाव येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 10 ते 11.30 या वेळेत हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. दुपारी 1 वाजता माहूर शासकीय विश्रामगृह येथे पोहचून 1 ते 3 या दरम्यान माहूर व किनवट तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.

त्यानंतर भोकर येथे त्यांचे 5 वाजता आगमन होईल. 5 ते 6.30 या वेळेत भोकर येथील शासकीय विश्रामगृहात भोकर, उमरी, धर्माबाद या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबर रोजी गुरूवारी सकाळी 9 ते 12 या वेळात शासकीय विश्रामगृह नांदेड येथे नांदेड, अर्धापूर, मुदखेड व इतर सर्वच तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उपलब्ध असतील. पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्षनिरीक्षकांशी भेटताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे बंधनकारक आहे.
दोन्ही पक्षनिरीक्षक प्रत्येक तालुक्यामध्ये जावून पक्षसंघटनाबाबत आढावा घेतील व कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांच्या भेटी घेवून चर्चा करतील. या दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पक्षनिरीक्षकांच्या या दौर्‍यात सर्व फ्रंटचे पदाधिकारी व इतर सेलचे पदाधिकारी तसेच प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या सूचना मांडाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री व नांदेड जिल्ह्याचे प्रभारी जयप्रकाश दांडेगावकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा नांदेड ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांनी आवाहन केले आहे.

%d bloggers like this: