Nanded News

नांदेड़:खा.चिखलीकरांच्या पुण्याईने मिळालेल्या आमदारकीचा लोककल्याणासाठी वापर करा

भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांचा आ.श्यामसुंदर शिंदे यांना सल्ला

कंधार : ज्यांना राजकारण आणि निवडणूका म्हणजे काय हे माहित नव्हते त्यांना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुण्याईने थेट विधानसभेपर्यंत पोहचता आले त्या आ.श्यामसुंदर शिंदे यांनी बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुण्याईने मिळालेल्या आमदारकीचा वापर लोककल्याणासाठी करावा, असा खोचक सल्ला भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिला आहे.

कंधार – लोहा विधानसभा मतदारसंघातून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुण्याईने व त्यांच्या लक्ष्मी पुण्याईने निवडून आलेले आ.श्यामसुंदर शिंदे यांनी काल कंधार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तत्कालीन आमदार तथा विद्यमान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्तृत्वावर अनेक आरोप केले. लोहा येथील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा निधी आमदारांमुळे परत गेला असा आरोप चिखलीकर समर्थक करत असल्याची ओरड केली. शिवाय चिखलीकर आमदार असतांना मतदारसंघात काय दिवे लावले अशी पातळी सोडणारी टिकाही केली. वास्तविक लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुतळा उभारणीचा निधी परत गेल्याचा उल्लेख केला मात्र तो आमदारांमुळे गेला असे ते म्हणाले नव्हते. खा.चिखलीकर यांनी मंजूर केलेले तिघाडी सरकारने मंजूर केले नाही. त्यामुळे निधी परत गेला असे म्हणाले होते. त्यामुळे आ.शिंदे यांनी इतकी आगपाखड करुन घेणे कशासाठी? एवढेच नाही तर कंधार-लोहा तालुक्यात ज्या आरोग्य केंद्रांना लवकरच मंजूरी मिळणार असल्याची माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांना दिली होती. त्या माहितीचा आ.श्यामसुंदर शिंदे यांनी न वाचताच विपर्यास केला. माध्यमात छापून आलेल्या प्रत्येक बातमीत लोहा -कंधार तालुक्यात आरोग्य केंद्रांना लवकरच मंजूरी मिळणार असा उल्लेख आहे. परंतु पी हळद अन् हो गोरी या उक्तीप्रमाणे सहज आमदारकी मिळालेले शिंदे भलतेच हुरळून गेले आहेत, असा टोलाही तालुकाध्यक्ष राठोड यांनी लगावला आहे.

सन 2007 च्या आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्यात पानशेवडी येथील आरोग्य केंद्राला मंजूरी मिळाली होती परंतु जागेचा वाद उदभवल्याने निविदा प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती त्यामुळे निधी परत गेला होता. ही बाब आ.श्यामसुंदर शिंदे यांनी निटपणे समजून घेणे आवश्यक होते. ज्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध वृत्तपत्रांची कात्रणे दाखविली आणि आपण खुप मोठा गौप्यफोट केल्याचा आव निर्माण केला. त्याऐवजी आ.श्यामसुंदर शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने ज्या शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन पाण्यात गेले, ज्वारीच्या कनसावर मोड फुटले ते सोयाबीन आणि मोड फुटलेले कणीस विधानसभेत नेऊन दाखविले असते, शेतक-यांसाठी आवाज उठविला असता. नुकसान भरपाई मिळवून दिली असती तर शिंदे लोकप्रतिनिधी दिसले असते. दुर्दैवाने आ.शिंदे यांना अद्यापही लोकहिताचा कळवळा नसल्याचे दिसून आल्याचेही भगवान राठोड म्हणाले.

तत्कालिन आमदार तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात लिंबोटी धरण उभारले याची माहिती आमदारांना नाही का? मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम शिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबडेकर शासकीय मुलांचे वसतीगृह मंजूरीसाठी कोणी प्रयत्न केले? शासकीय 4 गोदाम कोणाच्या काळात मंजूर झाली? कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या 30 खाटांची क्षमता 50 खाटापर्यंत कुणामुळे पोहचली? याचा अभ्यास आ.श्यामसुंदर शिंदे यांनी आधी करावा. ज्यांच्यामुळे राजकारणाचा र आपणास कळाला. आपण आमदार झालात त्यांच्यावर बिनबुडाचे आणि अल्पज्ञानी आरोप करणे सोडून द्यावे, लोकहितासाठी, लोकहिताच्या प्रश्नांचा अभ्यास करावा. जनतेला कोण खोटे बोलत आहे. हे कंधार – लोह्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे, हे आपण सांगण्याची गरज नाही, असा उपरोधिक सल्लाही भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिला आहे. शिवाय खासदारांवर आरोप करतांना किमान भाषेची पातळी काय असावी याचे भान स्वतःला खुप हुशार समजणा-या आ.शिंदे यांनी राखावे अन्यथा कंधार – लोह्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवितील असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.

%d bloggers like this: