National News

बिबट्याने पाडला दोन वासराचा फडशा ; शेतकऱ् यांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याने पाडला दोन वासराचा फडशा ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अर्धापूर (शेख जुबेर ) भुकेल्या हिंस्त्र प्राण्याचा हल्ला शेतकऱ्यांचे पशुधन फस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
अर्धापूर तालुक्यातील वन परिमंडळातील लहान,पाटणूर,चेनापूर,पिंपळकोटा शिवारात काही भागात बिबट्याने दहशत पसरवली आहे मागील काही महिन्या खाली शेतातील प्राण्यांना बिबट्याने फास्त केल्याच्या घटना घडल्या आहेत या घटनांमुळे परिसरातील नागरिक व शेतकरी यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून " बिबट्या आला रे बिबट्या आला " अशा वातावरणात नागरिक आपले जीवन जगत आहेत.
तहानलेले व भुकेले हिंस्र प्राणी शेतकऱ्यांचे पशुधन फस्त करीत आहेत लहान परिसरात जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा वावर सुरू झाला आहे. दि.१३ ऑक्टोंबर रोजी रात्री लहान परिसरातील शेतकरी देविदास माणिक कल्याणकर यांचे (गोवंशाचे) दोन वासरे फस्त केले अंदाजे वीस हजाराचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि.१४ ऑक्टोंबर रोजी वन विभाग नांदेड वनपरिक्षेत्र अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील दोन गोरे बिबट्याने फस्त केल्याचा पंचनामा वनपाल पांडुरंग धोंडगे अर्धापूर, वनमजूर विलास बेटकर, पुंजाराम डोकले, दत्ता भिसे यांनी केला. शवविच्छेदन पशुधन अधिकारी डॉ. चव्हाण यांनी केला असून यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे वीस हजार किमतीचे नुकसान झाले आहे पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनपाल धोंडगे यांनी यावेळी दिली.

००प्रतिक्रिया००
बिबट्या हा रात्रीच्या काळोखात मध्ये हल्ला करीत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे बंद गोठ्यात बांधावी व लहान जनावरांना मोठ्या जनावरांच्या मध्यभागी ठेवावे, शेकोटी पेटवावी किंवा विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी.
– पांडुरंग धोंडगे वनपाल

%d bloggers like this: