Nanded News

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन

नांदेड :(वरक- ताजा न्यूज ):मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती लवकरात लवकर उठविण्याच्या मागणीसाठी  स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर जागर आंदोलन करणार असल्याची माहिती  प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांनी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीकडे घटनापीठ लवकर स्थापन करण्यासाठी अर्ज करावा, घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, यासाठी अर्ज करावा, घटनापीठ स्थापन झाल्यानंतर स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत, हे सर्व शक्य नसेल तर मराठा आरक्षण अबाधीत ठेवण्यासाठी नवीन अध्यादेश काढावा, तसेच मराठा आरक्षणावर दोन दिवशीय विशेष अधिवेशन घ्यावे, सारथी संस्था पुर्ववत सुरू करावी आणि सारथीचे कामकाज, कोर्सेस सुरू करण्यासाठी १ हजार कोटीचा निधी द्यावा, या व इतर मागण्यांसाठी १५ ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर जागर आंदोलन करण्यात येणार आहे. पालकमंत्री हे सध्या नांदेडात नसून ते येईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा माधव देवसरकर यांनी दिला आहे.

%d bloggers like this: