National News

13 October, 2020 17:47

आगामी काळात येणारे सन उत्सव नागरिकांनी शांततेत साजरे करावे – पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे

अर्धापूर ( शेख जुबेर ) आगामी काळात येणारा दर्गा महोत्सव, दसरा,दिवाळी, इद हे सन-उत्सव नागरिकांनी उत्साहात व शांततेत साजरे करावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी सोमवारी (ता.12) शांतता समितीच्या बैठकीत केले.

दुर्गा महोत्सव, दसरा,दिवाळी, इदच्या पार्श्वभूमीवर अर्धापूर पोलीस स्टेशनच्या वतिने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायख,व्यापारी जगदीश भुतडा,गौस मुल्ला उपस्थित होते. पोलीस स्टेशनच्या वतिने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पत्रकार लक्ष्मीकांत मुळे,राजु शेटे,मुसबीर खतीब यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी प्रविण देशमुख, सुनिल देशमुख,पत्रकार गुणवंत विरकर,युसूफ पठाण, अनवर भाई,उमेश सरोदे, ओमप्रकाश पत्रे,सखाराम क्षिरसागर,व्यंकटी लंगडे, शेख साबेर,गौरव सरोदे आदींची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमादार किशोर पाटील, परमेश्वर कदम,बाबासाहेब चौदंते,कल्याण पांडे, विद्यासागर वैद्य,पानपट्टे,गोणारकर,रघुवंशी यांनी परिश्रम घेतले.

%d bloggers like this: