National News

शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथ े भरला सीताफळ मोहत्सव …

शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे भरला सीताफळ मोहत्सव …

अर्धापूर ( शेख जुबेर )

शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बोटॅनि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, शेती मालास आज चांगले व्यापारी महत्व आले पाहिजे या सामाजिक जाणिवेतून महाविद्यालयात सीताफळ मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावर डॉ.कुंटुरवार ,प्रा बोरसे ,वरिष्ठ लिपीक गायकवाड बी. के. ,डॉ. रघुनाथ शेटे,डॉ.राजेश पाटील ,सुनील धोबे यांची उपस्थिती होती.
उदघाटन पर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य के.के.पाटील म्हणाले की भारत हा शेती प्रधान देश आहे . येथील सत्तर टक्के जनता ही शेती व्यवसाय करते , शेतीला व्यावसायिक जोड मिळण्यासाठी असे महोत्सव आयोजित करून उत्पादकास प्रोत्साहन दिले पाहिजे.
या महोत्सवाचे संचलन डॉ.राजेश पाटील यानी केले.प्रस्तावना रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रघुनाथ शेटे,यांनी केले त्यांनी या सीताफळ महोत्सवाचे आयोजनाची भूमिका मांडतांना ते म्हणाले की अशा मोहत्सवा चे आयोजन हे सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे आहे.या कार्यक्रमाचे आभार सुनील धोबे यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सीताफळ खरेदी करून या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: