Nanded Marathi News

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा :लवकरच पुणे आणि मुंबईसाठी रेल्वे सुरू होणार

नांदेड :  सध्या ऑनलॉक ५ सुरू असल्याने केंद्र सरकारच्या नियम आणि अटी च्या अधीन राहून अनेक व्यवस्थापन सुरू झाले आहेत .त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असल्याने  नांदेड ते मुंबई रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच नंडेदहून पुणे आणि मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपायोजना, नागरिकांमध्ये निर्माण झालेली जनजागृती पाहता केंद्र सरकारने अनेक बाबतीत सुट दिलेली आहे .
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अनेक व्यवस्थापन पूर्ववत कार्यरत होत आहेत. त्यामुळे आता मुंबई आणि पुण्याला जान्या येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी अनुषंगाने नांदेडहून पुण्याला द्वीसाप्ताहिक ही रेल्वे दर रविवार आणि मंगळवारी येत्या 20 ऑक्टोबर पासून सुरु होण्याची शक्यता आहे तर नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस 15 ते 23 ऑक्टोबर च्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे.  या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद महाप्रबंधक गजानन मल्ल्या आणि रेल्वे मंडळ प्रबंधक नांदेड यांच्याकडे ही सतत पाठपुरावा सुरू आहे.
त्यामुळे लवकरच नांदेड पुणे द्विसाप्ताहिक ही रेल्वे गाडी आणि नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक रेल्वेच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात किंवा नांदेडकरांसाठी अधिक रेल्वे प्राप्त व्हाव्यात या अनुषंगानेही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यापूर्वीही पाठपुरावा केला होता. त्यामुळे नांदेडकरांना नव्या रेल्वेचा लाभ घेता आला . सध्या देशभरातील अनेक भागात रेल्वे बंद आहेत. ज्या काही थोडाफार रेल्वे सुरू आहेत  त्याचा फायदा नांदेडच्याही प्रवाशांना व्हावा, पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी , प्रवाशांचा प्रवास सुखात व्हावा यासाठी आताही खा. चिखलीकर यांनी नांदेडच्या रेल्वे  प्रवाशांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेता नांदेडहून पुण्यासाठी आणि नांदेड मुंबईसाठी रेल्वे गाडी सुरू करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही ट्रेन सुरू होणार असल्याची शक्यता आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: