National News

अर्धापूरात काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या का र्यकारणीची निवड

अर्धापूरात काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या कार्यकारणीची निवड

अर्धापूर (शेख जुबेर ) काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या महिला तालुकाध्यक्षपदी शबाना बेगम तर युवकच्या फाऊंडेशनच्या सचीवपदी सचिन रामचंद्र कांबळे, उपाध्यक्षपदी शेख नासेर गौसमुल्ला यांची निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.
काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे पाटील,शहराध्यक्ष राजेश्र्वर शेटे, जिल्हा सचीव निळकंठराव मदने, सेवाचे तालुकाध्यक्ष संतोष कपाटे,राजाराम पवार,सरपंच शंकर ढगे,संजय गोवंदे,बाळू पाटील धुमाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गव्हाणे म्हणाले कि, काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरणे,शासकीय योजना जनसामान्यांपर्यत पोहचविणे,जनतेची कामे करणे याकडे सबंधीतांनी लक्ष द्यावे असे ते म्हणाले,यावेळी राजकुमार मदने,कैलास ठोंबरे,साहेबराव हापगुंडे,हरी आचलखांबे,शकील खान पठाण, शेख साबेर मुल्ला,देवानंद कांबळे,लक्ष्मण कांबळे,शंकर कांबळे,विनोद जोगदंड,धनंजय शेटे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

%d bloggers like this: