
हाथरस येथे झालेल्या बलात्कार व खुन प्रकारणातील आरोपीला फाशी दिया भिमटायगर सेनेची मागणी
अर्धापूर ( शेख जुबेर )
उत्तरप्रदेश हाथरस येथील दलितकुटुंबातील मनिषा वाल्मिकी हिच्यावर बलत्कार करून जिवंत मारण्याऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी भिमटायगर सेनेच्या वतीने दि ७ आक्टोंबर बुधवार रोजी अर्धापूर तहसील समोर निषेध करत बनियान आंदोलन करण्यात आले.
हाथरस (उत्तर प्रदेश)येथील दलीत कुटुंबातील मुलीवर सामूहीक अत्याचार करून जीवे मारणाऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी चे निवेदन तहसिलदार सुजीत नरहारे यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,हाथरस(उ.प्र.)येथील दलित कुटुंबातील मुलीवर सामूहीक अत्याचार करून तीची जीभ कापून अमानुष कृत्य केले आहे.यात तीचा मृत्यू झाला असून सदर आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन दोषी प्रशासनावर सुध्दा
कड़क कार्यवाई करण्यात यावी असे निवेदन देन्यात आले.यावेळी.आंदोलन करत पुढील.मागण्या १.सदर प्रकरणातील आरोपीला तातकाल फाशी देण्यात यावी.२ ) गुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण व एकास शासकीय नौकारी व १ कोटी रूपयाचे शासकीय गत शासनाने तात्काळ देण्यात यावे. असे मागण्या अर्धापूर तालुका भिम टायगर सेनेच्या वतीने.दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालय.समोर.करण्यात आले.यावेळी.उपस्थित दादासाहेब शेळके, विजयकुमार इंगडे,सिद्धार्थ काटकांबळे,कपील सोनटक्के, रंगनाथ गव्हाणे, मुकेश लोणे, आनंदराव करवंदे, मनोज आंबेगावकर,बी एस साखरे, पिराजी गाडेकर,राजेश आठवले,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
