National News

उमेद अभियानातील वर्धिनींवर आली उपासमारी ची वेळ राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी

उमेद अभियानातील वर्धिनींवर आली उपासमारीची वेळ

राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी

अर्धापूर ( शेख जुबेर ) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वर्धिनी या पदावर कार्यरत असलेल्या महिलांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गावोगावी जाऊन स्वयंसहायता समूह बचत गटाची निर्मिती करणे त्यांना प्रेरणा देणे, प्रशिक्षण देणे व समूह करणे इत्यादी कामासाठी वर्धिनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत मोलाची भूमिका बजावत महिला सक्षमीकरणाठी झटणाऱ्या वर्धिनींचे काम बंद आहे. महिलांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे उमेद कडून उमेद संपल्याने वर्धिनी महिलांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
गावोगावी जाऊन स्वयंसहाय्यता समुह तयार करणे त्यांना प्रेरणा व प्रशिक्षण देणे हे समूह चालवण्यासाठी सीआरपी (कमुनिटी रिसोर्स पर्सन) निवडणे व त्यांना प्रशिक्षित करणे इत्यादी कामासाठी वर्धिनींची निवड झाली होती. ग्रामीण भागातील भूमिहीन, शेतमजूर ,अल्पभूधारक, निराधार, एकल महिलांना शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी अभियाना सोबत जोडून देणाऱ्या वर्धिनींची मात्र राज्य शासन अवहेलना करीत आहे. कोरोना काळात वर्धीनी वर उपासमारीची वेळ आली यामुळे अर्धापूर तालुक्यातील वर्धिनींनीनी गटविकास अधिकारी अर्धापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले आहे. लॉकडाऊन व करोन महामारी मुळे उपासमारीची वेळ आली असुन संकट निधी म्हणून आर्थिक मदत द्यावी, दररोज काम द्यावे व कामाचा योग्य मोबदला द्यावा, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान खाजगी यंत्रणेच्या ताब्यात देऊ नये, उमेद अभियानातील वर्धिनी डी एम, बी एम,सी सी, ऑपरेटर, सीआरपी, बँक सखी इत्यादी पदावर कार्यरत कामगारांना अभियानात सुरक्षित करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी ता.अध्यक्ष दिपमाला सूर्यवंशी, ता. सचिव संगीता जोगदंड,अरुणा सराटे ,संगीता जोगदंड,भारतबाई वाघमारे ,विशाखा लोणे,दमयंती सावते,शालिनी वाहेवळ, कविता कदम आदींची उपस्थिती होती.

%d bloggers like this: