अर्धापूरात माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय अधिकारी व कोरोना यौध्दाच्या सन्मान.

अर्धापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचा उपक्रम.

अर्धापूर (शेख जुबेर ) शारदा भवन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष, भोकर मतदार संघाच्या माजी आमदार सौ.अमिताताई अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतिने वैद्यकीय अधिकारी व कोरोना यौध्दाच्या सन्मान करण्यात आला.त्यांना सँनिटाइजर,हँन्डग्लोज,माँस्क,व्हिटँमीन सी गोळ्या व वैद्यकीय साहित्य देण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्या झिने,वैद्यकीय अधिकारी डाँ. रवि मोरे,डाँ. आनंद शिंदे,डाँ.विशाल लंगडे यांनी कोरोना काळात अहोरात्र सेवा केल्याबद्दल सन्मान करून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना साहित्य वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजु शेटे,संचालक प्रविण देशमुख, माजी नगराध्यक्ष नासेरखाँ पठाण,नगरसेवक मुसबीर खतिब, उमेश सरोदे, गाजी काजी,महमंद सुलतान,बाळू पाटील धुमाळ, रंगराव इंगोले,जिल्हा सचिव निळकंठ मदने,राजु पवार,शंकर ढगे,संजय गोवंदे,रणधीर लंगडे,संदिप राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.