National News

वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकाने मांडला शाळ ेतच संसार. वेतनाच्या मागणीसाठी 12 वर्षापासून लढा..

वेतनाच्या मागणीसाठी शिक्षकाने मांडला शाळेतच संसार. वेतनाच्या मागणीसाठी 12 वर्षापासून लढा..

अर्धापूर ( शेख जुबेर ) शहरातील एका खासगी गर्ल्स हायस्कूल मध्ये गेली 22 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आसलेल्या शिक्षकाला हक्काच्या वेतणासाठी वणवण भटकंती करावे लागत असून कंटाळलेल्या शिक्षकाने 11 वर्षाचे वेतन व आनामत रक्कम परत मिळावी या मागणीसाठी आपला संसार चक्क शाळेतच थाटला आहे.संसार उपयोगी साहित्य व मुलांन सोबत आपले बि-हाड शाळेतच थाटले आहे.पिडीत शिक्षकाने वेळोवेळी शिक्षण विभाग,संस्थाचालकाला निवेदन देवून वेतन देण्याची मागणी केली आहे.तसेच न्यायालयात दाद मागितली आहे.

आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन,उपोषण ,निवेदन, आदी मार्गाने आंदोलन करण्यात येते.कधी गांधीगिरी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येते.ज्या शाळेत आध्यापणाचे काम केले त्याच शाळेत वेतनासाठी शिक्षकाला संसार थाटवा लागला आहे.सदरील पिडित शिक्षक आपल्या मुलासाह गांधीगिरी करून सोमवारी सायंकाळ पासून (ता पाच ) आंदोलन करित आहे.या आनोख्या अंदोलनाने जिल्हाचे लक्ष वेधले आहे.

नांदेड येथील एका माजी आमदाराजी अर्धापूर शहरांत गेल्या तीन दशकापासून गर्ल्स हायस्कूल कार्यरत आहे.या शाळेत 22 पुर्वी भास्कर लोखंडे हे इंग्रजीचे शिक्षक म्हणून रूजु झाले आहेत.शाळा अनुदानित झाल्यावर पुर्ण वेतन मिळेल या आशेवर अध्यापणाचे काम नेटाने करित आहेत.तसेच कुटूंबाला अर्थिक अधार मिळावा यासाठी खासगी शिकवण्या घेवुन दिवसं काढली.यातच त्यांच्या पत्नीचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला.

सध्या गेल्या सहा महिन्या पासून ताळेबंद आसल्यामुळे खासगी शिकवण्या बंद झाल्या आहेत.घरखर्च व मुलांचे शिक्षण आदी खर्च भागत नाही.वेतनही नाही.आशी बिकट परिस्थिती उद्भविल्याने वेतन मिळावे यासाठी पिडीत शिक्षकाने आपला संसार चक्क शाळेतच्या एक वर्ग खोलीत थाटला आहे.यात संसार उपयोगी साहित्य,पंखा, गॅस, धान्य आदी रोज लागणा-या वस्तू आहेत.

मी गेल्या 22 वर्षापासून शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.शाळा अनुदानित झाल्यावर वेतन मिळेल आशी अपेक्षा होती.पण माझा अधिकार डावलण्यात आला.अर्थिक परिस्थितीमुळे पत्नीच्या अजारवर खर्च करू शकलो नाही.यातच तिचा मृत्यू झाला.वेळोवेळी निवेदन दिली,संस्था चालकांकडे दाद मागितली.तसेच न्यायालयात गेलो.सध्या बिकट परिस्थिती उद्भवल्याजने मझ्या मुलांसह शाळेतील वर्ग संसार थाटला आहे. माला मानसिक त्रास देण्यात आला. वेतन व अनामत रक्कम मिळण्यासाठी शाळेत संसार थाटला आहे. रिक्त झालेल्या जागी नियुक्त करून वेतन देण्यात यावे आशी वेळोवेळी मागणी केली .पण मला न्याय मिळाला नाही. प्रतिक्रिया भास्कर लोखंडे यांनी दिली

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: