नांदेड – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हाथरस घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.  शहरभर मानवी साखळी करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नांदेडच्या जनतेने आपला असंतोष व्यक्त केला.उत्तर प्रदेशातील हाथरास घटना म्हणजे माणुसकीला काळीमा असून या प्रकरणातील आरोपींना वाचण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने सर्व प्रशासकीय यंत्रणा काम करत आहेत.

  सदरील मुलीची हत्या होऊन नऊ दिवस लोटल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आला. मुलीच्या उपचारासाठी वेळीच योग्य निर्णय घेतले गेले नाहीत. सातत्याने या प्रकरणातील पुरावे कसे  नष्ट होतील  याची काळजी घेण्यात आली.  दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार होऊ नये.   त्याएवजी  दिल्लीतील एम्स मध्ये तिच्यावर योग्य उपचार झाले पाहिजे अशी सामाजिक संघटनांनी मागणी करूनही प्रशासनाने आपली मनमानी करत तरुणीवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार केले. परिणामी योग्य उपचार न झाल्याने पीडित तरुणी दगावली. त्यानंतरही उत्तर प्रदेश प्रशासनाने आपली हैवानीयत  कायम ठेवली आणि सदरील मुलीवर मध्यरात्री नातलगांच्या परवानगीशिवाय व नातलगांना न बोलावता तिला जाळून टाकण्यात आले.  उत्तर प्रदेश सरकारचे व एकूणच उत्तर प्रदेश पोलिसांची ही भूमिका कमालीची संशयास्पद असून आरोपींना वाचवण्यासाठी व दलित मागासवर्गीय समाजातील पीडित महिलेचे प्रकरण दडपण्यासाठी केलेले कट कारस्थान आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनात म्हटले आहे.

  एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देत दुसरीकडे राज्यातल्या दलित ,  मागासवर्गीय लेकींना बलात्कार करून तिची जीप कापले जाते हे अत्यंत घृणास्पद बाब असून त्वरित या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.  याप्रकरणी राज्य सरकारची भूमिका आरोपीच्या बाजूने असल्याने व पुरावे नष्ट करण्यासाठी केलेले कट-कारस्थान लक्षात घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट उर्फ योगी यांना या प्रकरणात सहआरोपी करावे.  त्याच बरोबर सरकारच्या तालावर नाचून पुरावे नष्ट  करणाऱ्या व पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना  तात्काळ निलंबित करून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे असेही निवेदनात म्हटले आहे.  आज सकाळी ठीक दहा वाजता महात्मा फुले यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या मानवी साखळी निषेध आंदोलनास  सुरुवात झाली.  महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक येथून वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी शारीरिक अंतर ठेवून व हातात जस्टीस फॉर मनीषा वाल्मिकी, योगी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत साखळी आंदोलन केले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि.  प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या या आंदोलनाचा समारोप जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात पीडित कुटुंबावर अद्यापही सवर्ण जातींचा दबाव असून काही सवर्ण जातीचे गुंड गावात जाऊन बैठक घेत असल्याचे सामाजिक माध्यमातून निष्पन्न झाले आहे.

  त्यामुळे सामाजिक माध्यमावर आलेल्या चित्रफिती पाहून अशा गुंडावर सरकारने तात्काळ कारवाई करावी.  गावात वाल्मिकी समाजाला सवर्ण समाजाच्या धमक्या येत असून राज्यातील वरिष्ठ अधिकारीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या समाजाला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यामुळे गावात असलेला बाल्मीकि समाज कमालीचा तणावाखाली व दहशतीखाली आहे.  त्यामुळे त्या गावातील सर्वच वाल्मीकी समाजाचे शहरी भागात पुनर्वसन करावे व प्रत्येकाला जगण्यासाठी साधनांची उपलब्धता करून द्यावी.  पीडित कुटुंबाच्या एका व्यक्तीला  शासकीय नोकरी देण्यात यावी,  तात्काळ या कुटुंबाला एक कोटीची शासकीय मदत देण्यात यावी व सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालून आरोपींना तात्काळ फासावर लटकवण्याची व्यवस्था करावी असेही निवेदनात म्हटले आहे.  या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचेउत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि . प्रशांत इंगोले  दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले महा सचिव श्याम कांबळे, साहेबराव बेले ,  महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान पठाण, महानगर महासचिव शेख बिलाल हनुमंत सांगळे,  महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, कौशल्याताई रणवीर, मराठवाडा सदस्य डॉ. संघरत्न कुरें, चंद्रकला चापळकर, अंजली अटकोरे, कामगार आघाडीचे अद्यक्ष राज अटकोरे,सम्यकचे कैलाश वाघमारे, संदीप वने, निता कंधारे , निरंजना आवटे , प्रज्ञा अटकोरे आदींची उपस्थिती होती.