Nanded Marathi News

नांदेडच्या सायकलपटू व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा,तरोडानाका ते लिंबगाव रस्ता सकाळी अवजड वाहनासाठी बंद

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी हा मार्ग सायकलपटू व पायी फिरणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. या विनंतीचा व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हे निर्देश दिले.  
 
या निर्देशाप्रमाणे तरोडानाका ते लिंबगाव पर्यंत सकाळी 6 ते 9 या कालावधीत यापुढे जर अवजड वाहने आल्यास मोटार ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

जनहित लक्षात घेऊन व जिल्ह्यातील युवा क्रीडापटू, खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल क्रीडापटूंनी समाधान व्यक्त केले.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: