नांदेड:-  माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी व देशाच्या लेकीला न्याय देण्यासाठी नांदेडकरांनी मंगळवारी होणाऱ्या मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.स्त्रीला देव म्हणणाऱ्या भारतीय संस्कृतीत आता महिला सुरक्षित राहिल्या नसून देशात असलेले सरकार एकीकडे बेटी बचाव’चा नारा देत दुसरीकडे बेटीवर होणाऱ्या अन्यायाला रोखण्यात असमर्थ ठरले आहेच. प्रसंगी आरोपीच्या बाजूने उभे टाकत असल्याचे अतिशय विदारक चित्र देशात निर्माण झाले आहे. अशावेळी देशातील महिला सुरक्षित आहे का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून आरोपींना कठोर शासन होत नसल्याने या घटनांत आणखीन वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली घटना माणुसकीचे लक्तरे वेशीवर टांगनारी असून या प्रकरणातील देशाच्या लेकीला आरोपीने अमानुषपणे छळ करून , लैंगिक अत्याचार करून तिची जीभ कापून व पाठीचा मणका तोडून हत्या केली आहे, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील ढोंगी योगी सरकार आरोपीच्या बाजूने उभे टकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदरील पीडित मुलीवर योग्य उपचार झाले नाहीत त्यामुळे तिला प्राणास मुकावे लागले आहे. तिच्यावर शेवटचे संस्कारही इथल्या व्यवस्थेने होऊ दिले नाहीत. अशावेळी समाजातुन मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटनांचा विरोध व्हायला हवा तरच अशा घटनांना आळा घालता येईल.

हाथरस प्रकरणातील देशाच्या लेकीला  न्याय मिळाला तरच देशातल्या लेकीबाळी सुरक्षित राहतील. त्यामुळे अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या नांदेडकरांनी मंगळवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी हाथरस प्रकरणातील देशाच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी मुर्दाड प्रशासनाचा भांडाफोड करण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, गोविंद दळवी,  मराठवाडा सदस्य डॉ. संघरत्न कुरे , जिल्हा अध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, शिवा नरंगले महिला जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान पठाण, महासचिव शाम कांबळे,  साहेबराव बेळे , शेख बिलाल,  सांगळे कामगार आघाडीचे अध्यक्ष राज अटकोरे,  सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघमारे, संदीप वने आदींनी केले आहे .