अर्धापुरात हातरस घटनेच्या निषेधार्थ काॅग्रेसने धरने धरून काढला मोर्चा..जिल्हातील काॅग्रेसच्या आमदारांची आंदोलनात उपस्थिती..

अर्धापूर ( शेख जुबेर ) केंद्रातील मोदी सरकारच्या काळात महिलांवर आत्याचार वाढले असून देशभरातील महिला असुरक्षित आहेत . ऊत्तर प्रदेशात महिलांवर आत्याचार वाढत आहेत.हातरस घटनेतील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी आशी मागणी आमदार आमरनाथ राजूरकर यांनी केली. काॅग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला.

उत्तरप्रदेशातील हातरस जिल्हात एका मुलीवर झालेल्या अमानुष आत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काॅग्रेसच्या वतीने ‘देशव्यापी धरने आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते.आंदोलनास अर्धापूर शहरांत खुप मोठा प्रतिसाद मिळाला.या धरने आंदोलनात काॅग्रेसच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते व जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेवून धरने आंदोलन केले.तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हातरस घटनेचा तिव्र शब्दात निषेध करून योगी सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यात आल.

हातरस घटनेचे तीव्र पडसाद अर्धापूर शहरांत उमटले आहेत. काॅग्रेसच्या वतीने धरणे व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील प्रज्ञा बौद्ध विहारात पिडीत मुलीला श्रध्दांजली अर्पण करून मौन धारण करण्यात आले.यानंतर प्रज्ञा बौद्ध विहारापासून मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा बसस्थानक परिसर,बसवेश्वर चौक मार्गे तहसील कार्यालयाच्या परिसरात जावून सांगता करन्यात आली.या मोर्चात आमदार आमरनाथ राजूरकर,आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.मोहनराव हंबर्डे , आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी खासदार तूकाराम रेंगे , महापौर मोहिनी यवनकर, जिल्हा परिषद आध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, रेखाटने चव्हाण, मंगलाताई निमकर जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाआध्यक्ष बालाजी गव्हाने,शहराध्यक्ष राजु शेटे, शेख लायक, डाॅ विशाल लंगडे,सभापती कांतबाई सावंत, सुमेरा बेगम , प्रजापती लोणे , रेखाताई काकडे, महिला तालुका काॅग्रेसच्या आध्यक्षा उज्ज्वला इंगोले,मिणिषा सिनगारे आदी पदाधिकारी सहभागी झाले.

तहसील कार्यालयाच्या परिसरात योगी मोदी हटाव देश बचाव आदी घोषणा देण्यात आल्या..

या आंदोलनात, आनंदराव कपाटे नासेर खान पठान,पप्पु बेग ,प्रवीण देशमुख, मुसबीर खतीब,उमेश सरोदे,संजय लोणे, अशोक सावंत,शंकर ढगे,गणेश बोंढारे,आमोल डोंगरे,, चंद्रमुणी लोणे,रंगराव इंगोले,छत्रपती कानोडे,महंमद सुल्तान कैलास भुस्से ,बाळू पाटील , बालाजी कदम, व्यंकटराव साखरे, शबाना बेगम ,पंडित लंगडे, आदी उपस्थित होते..