कोरोना प्रकोपावेळी सारे थंडावले

ना फवारणी…ना दक्षता…ना जागृती…

नागरिकांमधून जंतुनाशक फवारणी ची मागणी

अर्धापूर (शेख जुबेर ) तालुक्यामधील शहरी व ग्रामीण भागामध्ये एकही रुग्ण नसताना कडक लॉकडाऊन पाळण्यात आला निर्जंतुकीकरणासाठी दररोज औषधांची फवारणी करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागामध्ये दक्षता समितीची स्थापना करून कडक पहारा देण्यात आला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गत काही महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा हाहाकार उडाला असून मात्र नेमके याच वेळी शासकीय यंत्रणा कोलमडलेली दिसून येत आहे. औषध फवारणी,दक्षता व जनजागृती याकडे कमे थंडावली.
ग्रामीण भागामध्ये एप्रिल व मे या कालावधीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसताना दक्षता समित्यांनी गाव पातळीवरील सुरक्षा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेत जंतुनाशक फवारणी करण्यात आली नागरिकही मास्क चा वापर करत गर्दी टाळत अंतर ठेवत आदी सुरक्षा ठेवत काळजी घेत होते मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या अर्धापूर तालुक्यामध्ये तीनशे पर्यंत गेली असून ही शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही स्थानिक पातळीवरील प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे तर प्रशासन विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते आदींकडून कोरोना जनजागृती कडे दुर्लक्ष होत असून जणू सर्व यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर न करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नियमाचे पालन न करणाऱ्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन कठोर कार्यवाही करण्यात यावी व ग्रामीण भागामध्ये जंतुनाशक फवारणी पुन्हा सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तालुक्यामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने जोराने कामाला लागणे गरजेचे आहे.

०० प्रतिक्रिया ००