अर्धापूर येथे महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

अर्धापूर ( शेख जुबेर )तालुक्यामधील शहरी व ग्रामीण भागामध्ये ठीक ठिकाणी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अर्धापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष राजेश्‍वर शेट्टे, तालुका अध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, निळकंठ मदने आदींची उपस्थिती होती
यावेळी तालुक्यातील लोण खु. येथील ग्रामपंचायत च्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच चंद्रमणी लोणे ,उपसरपंच रवि पाटील, पोलीस पाटील लक्ष्मण गदादे, अवधूतराव जाधव ,प्रभाकर बागल,परसराम सुर्यवंशी,सोपान पाटील,सुरेश लोणे,नागसेन लोणे,सह ग्रामपंचायत कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
राजाबाई मा.व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री याच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करून आभिवादन केले. यावेळी शरद देशमुख यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री याचे विचार विद्यार्थ्यांनी जिवनात आंगिकारले पाहिजे व गांधीजी व शास्त्री जी यांच्या विचारांची पताका आपण समाजात तेवत ठेवली पाहिजे आसे विचार व्यक्त केले.यावेळी आवदूत वाघमोडे,पर्यवेक्षक शरद देशमुख,वकनिष्ठ लिपिक महेश देशमुख,परिचर नामदेव कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती.