National News

अर्धापूरात खा.राहुल गांधी यांच्या अटकेच् या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतिने मुख् यमंत्री आदित्यनाथ योगी यांचा पुतळा जाळून रस ्तारोको आंदोलन.

अर्धापूरात खा.राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसच्या वतिने मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचा पुतळा जाळून रस्तारोको आंदोलन.

अर्धापूर ( शेख जुबेर ) उत्तर प्रदेश येथील बलात्कार पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असतांना खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पोलिसानी धक्काबुक्की करत अटक केली त्या निषेधार्थ गुरुवारी (ता.1) सायंकाळी अहिल्यादेवी होळकर चौकात अर्धापूर तालुका कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी पुतळा जाळून रस्तारोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.

उतरप्रदेश सरकारने सतेचा दुरुपयोग करीत लोकशाही मार्गाने पीडितेच्या कुटूबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या खा.राहुल गांधी व प्रियंका गांधींंना उतरप्रदेश पोलिसांनी सरकारच्या सांगण्यावरुन अक्षरक्ष गुंडाप्रमाणे वागणूक करुन धक्काबुकी केली.या घटनेचा गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून,पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे,योगी सरकार मुर्दाबाद,खा.राहुल गांधी जींदाबाद,यासह विविध घोषणांनी जाहीर निषेध केला,या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्र्वर शेटे,माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, मिर्झा अख्तरऊल्ला बेग, संचालक प्रवीण देशमुख,सचिव निळकंठ मदने,आर. आर.देशमुख, शिवसेनेचे काजी सल्लाऊदीन,सोनाजी सरोदे,डॉ.विशाल लंगडे,चंद्रमुनी लोणे,उमाकांत सरोदे,पंडीतराव लंगडे,बाळू पाटील धुमाळ, रंगनाथ इंगोले,व्यंकटराव साखरे,छत्रपती कानोडे,व्यंकटराव राऊत,राजु पाटील पवार,गोपाल पंडीत, नगरसेवक मुसव्वीर खतीब, गाजी काजी,म.सुलतान,फेरोज कुरेशी,गौसमुल्ला,गजानन मेटकर,पंडीत शेट्टे,शंकर ढगे,शंकर खंडागळे, नवनाथ ढगे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: