Nanded Marathi News

पावडे वाडी रस्त्याची खड्ड्यांनी झाली दुर ्दशा; स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नांदेड (शेख जुबेर )शहरा लगत आसलेल्या पावडेवाडी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने पावडेवाडी येथील ग्रामस्थांसह पूर्ण,निमगाव,दर्यापूर,भानपुर,वरखेड,वानेगाव,दर्यापूर,सायाळ आदी वीस ते पंचवीस गावातील नागरिक व प्रवासी या रस्त्याने पूर्णा मार्गाने जाण्यास जवळीक होत असल्याने अनेक वाहनचालक प्रवासासाठी याच मार्गाचा अवलंब करतात.
पावडेवाडी येथील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे व प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणार्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.
येथील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर या भागातील अनेक छोटे-मोठे विध्यार्थी,व्यवसायिक,कर्मचारी व शेतकरी असल्याने शेतीतील भाजीपाला दुध आणि इतर वाहनांची वर्दळ या रस्त्यावर सातत्याने सुरू असते. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्याचा त्रास परिसरातील शेतकर्यांना आण नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहे अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार तोंडी तक्रारी केल्या आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून तात्पुरत्या आश्वासन या रस्त्याच्या संदर्भात देण्यात येते, मात्र त्या आश्वासनांचा पुन्हा विसर पडत असल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी नागरिकांची पूर्ण होत नाही संबंधित रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणत्या प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रस्ता तात्काळ दुरु स्ती करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पावडेवाडी गुरुजी चौक या रस्त्याचे पावडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये दैन्यवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे पडले आहेत.अनेक शेतकर्यांची दररोज या रस्त्याला वर्दळ असते तसेच व्यापार्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात वर्दळीचा रस्ता असूनही संबंधित विभागाकडून कोणत्या प्रकारची दखल घेण्यात येत नाही नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

००प्रतिक्रिया००

पावडे वाडी येथील ग्रामस्थांना या रस्त्याने प्रवास करणाऱ्या अन्य वीस ते या पंचवीस गावातील वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– प्रल्हाद पावडे
( युवा सेना उपध्यक्ष नांदेड )

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: