National News

नांदेड रेल्वे बोर्डाच्या सल्लागार सदस्य पदी अँड. किशोर देशमुख यांची निवड

नांदेड रेल्वे बोर्डाच्या सल्लागार सदस्यपदी अँड. किशोर देशमुख यांची निवड.

अर्धापूर (शेख जुबेर) अर्धापूर नगर पंचायतचे गटनेते तथा भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अँड.किशोर बालासाहेब देशमुख यांची नांदेड रेल्वे बोर्डाच्या सल्लागार सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांना नियुक्तीपत्र नांदेड येथे देण्यात आले.

नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर,गंगाधर जोशी,मिलिंद देशमुख हे उपस्थित होते.त्यांची निवड ही दोन वर्षासाठी करण्यात आल्याचे पत्र नांदेड रेल्वे प्रबंधक दिवाकर बापु यांनी दिले आहे.

अर्धापूर तालुका निर्मिती पासून पहिल्यांदा शहरातील व्यक्तीची नांदेड रेल्वे बोर्डाच्या सल्लागार सदस्यपदी निवड करण्यात आली.

नांदेड रेल्वे बोर्डाच्या सल्लागार सदस्यपदी अँड. किशोर देशमुख यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा चिटणीस डाँ.लक्ष्मण इंगोले,भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,शहराध्यक्ष विलास साबळे, माजी सभापती बाबुराव हेंद्रे,सुधाकर कदम,बाबुराव लंगडे,रामराम भालेराव,सखाराम क्षिरसागर,अवधूत कदम,तुळसीराम बंडाळे,योगेश हाळदे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: