Nanded Marathi News

नांदेड:सिगरेट, बिडी व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या खुल्या विक्रीवर बंदी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कोविड-19 साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून कलम 7 पोटकलम2 अनुसार सिगारेट, बिडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ्यांची खुल्या किंवा सुट्ट्या विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

अशा खुल्या विक्रीद्वारे समाज हिताच्या व सार्वजनिक आरोग्य हिताच्या दृष्टीने आवश्यक असा संवैधानिक इशारा दिला जात नाही. खुल्या विक्रीतून आरोग्यास घातक असा इशारा ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. यामुळे हा निर्णय घेतला आहे. यापुढे पाकिटाशिवाय खुल्या विक्रीवर पूर्णता बंदी राहील असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपन इटनकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: