Parbhani Hindi News

परभणी: 5 दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय: जिल्हाधिकारी

परभणी / जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दि.26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश आज जारी करण्यात आला असून जनता कर्फ्यु मध्ये व्यापारी व नागरिकांनी 100 टक्के योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरणा चा हा प्रसार पाहता त्याला रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याची भावना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे. हा संसर्ग वाढत असतानाच नागरिक मात्र आवश्यकता नसताना घराबाहेर, बाजारपेठेत आणि इतरत्र फिरताना दिसत आहेत. ज्यामुळे या संसर्गाची वाढ झाली असून याला आता प्रतिबंध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ‘जनता कर्फ्यू’ ही संकल्पना शंभर टक्के अमलात आणून ती यशस्वी करणे आवश्यक असल्याचेही मुगळीकर म्हणाले. 

     त्यानुसार त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, ‘या जनता कर्फ्यू मध्ये जिल्ह्यातील सर्व दुकानदार, छोटे-मोठे बाजार, ग्रामीण कारागीर, छोटे व्यवसायिक, उद्योजक, शेतमाल विक्रीत सहभागी असणारे सर्व घटक, लघु व कुटीर उद्योजक त्याचप्रमाणे प्रवासी व मालवाहतूक करणारे चालक, मालक व वाहक या शिवाय शासकीय-निमशासकीय सेवा या सर्वांनी कोरोना विषाणूचा परभणी जिल्ह्यात वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी 26 ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या या जनता कर्फ्यूमध्ये शंभर टक्के योगदान द्यावे’, 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: