Nanded Marathi News

अर्धापूर नगर पंचायतला पुर्णवेळ मुख्याधि कारी द्या-नागरिकांची मागणी

नागरिकांची विविध कामे खोळंबली.

अर्धापूर ( शेख जुबेर ) अर्धापूर नगर पंचायतला गेल्या तीन महिन्यापासून प्रभारी मुख्याधिकारी असल्यामुळे नागरीकांची विविध कामे खोळंबली आहेत.येथिल नगर पंचायतला कायमस्वरूपी पुर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना,शौचालय योजना,फेरफार, नमुना 43,बांधकाम परवानगी,विवाह नोंदणी,ना हरकत प्रमाणपत्र,जन्म,मृत्यू प्रमाणपत्र यासह विविध योजनेचे लाभार्थी घरकुलाच्या पैसासाठी व अन्य कामासाठी दररोज नगर पंचायत चक्रा मारतात.त्यांना एकच उत्तर मिळते मुख्याधिकारी नाहीत.

अर्धापूर नगर पंचायतचे तत्कालीन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली 7 जुलै 2020 ला झाली.तेव्हा पासून येथिल नगर पंचायतचा कारभार प्रभारी मुख्याधिकारी प्रियंका टोंगे भोकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.तीन महिने झाले तरी पुर्णवेळ मुख्याधिकारी दिला नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.

चौकट घेणे –
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.प्रभारी मुख्याधिकारी असल्यामुळे शासनाचे विविध अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत नाही. या महामारीच्या काळात तरी शासनाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: