Nanded Marathi News

अमोल सरोदेला राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार जाहीर…

अर्धापूर ( शेख जुबेर )स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक अमोल उध्दवराव सरोदे याला नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे.

सन्मानचिन्ह, गौरवपदक, विशेष महावस्त्र, मानपत्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमोल सरोदे हा युवा कल्याण व खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सन २०१६ पासून स्वयंसेवक म्हणून कार्य करीत आहे. शिक्षणाबरोबरच समाजसेवेचा वसा तो पुढे चालवत आहे. त्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, श्रमदान, रक्तदान शिबिर आयोजन, पथनाट्य लिहून सादरीकरण, जल संवर्धन, आरोग्य शिबीरे, शौचालय निर्माण जनजागृती, विविध सर्वेक्षण, महिला सक्षमीकरण जागृती, पक्षी संरक्षण अभियान याबरोबरच कोरोना महामारीच्या महासंकटात तो सुरुवातीपासून आपली सेवा बजावत आहे. अन्नदान, मास्क वाटप, हात धुणे जागृती, आरोग्य सेतू ॲप जागृती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रोत्साहन अशी अनेक उपक्रम समाजात राबविले आहेत. तसेच राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, जिल्हा, महाविद्यालय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या या कार्याची नोंद घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने राज्यपातळीवर आदर्श युवक म्हणून महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार त्याला जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंम्मेलन, नाशिक या ठिकाणी डिसेंबर महिन्यात होणार आहे. अमोल सरोदेच्या या यशाबद्दल जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेट्टे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक, उपनगराध्यक्षा सौ.डॉ. पल्लवीताई विशाल लंगडे,माजी नगराध्यक्ष नासेर खान पठाण,अधिवक्ता संघाचे अध्यक्ष,नगरपंचायत गटनेते ॲड. किशोर देशमुख, ॲड. गौरव सरोदे, प्रविण देशमुख,पंडितराव लंगडे, उमेश सोनाजी सरोदे, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, ओमप्रकाश पत्रे,जिल्हा सचिव निळकंठराव मदने,गोविंद सिनगारे,लक्ष्मीकांत मुळे,रामराव भालेराव, उदय कुमार गुंजकर,संपादक सखाराम क्षिरसागर, गोविंद टेकाळे, गुणवंत विरकर, इरफान पठाण, जुबेर, साबेर, दिगांबर मोळके,गोविंद राऊत, दिपक विरकर,रमेश विरकर, यांच्यासह आदिंनी कौतुक व अभिनंदन केले.

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: