National News

शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरच्य ा विकास समितीवर संचालक प्रविण देशमुख व उपनगर ाध्यक्षा डाँ.पल्लवी लंगडे यांची निवड.

शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरच्या विकास समितीवर संचालक प्रविण देशमुख व उपनगराध्यक्षा डाँ.पल्लवी लंगडे यांची निवड.

अर्धापूर ( शेख जुबेर ) शहरातील डाँ.शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूरच्या महाविद्यालय विकास समितीवर भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे संचालक प्रविण सखारामजी देशमुख व अर्धापूर नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षा डाँ.पल्लवी विशाल लंगडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांना शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.के.के.पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 अन्वये गठीत करण्यात आलेल्या उद्योग विकास समितीवर दोघांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
या समितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी राज्यमंत्री डि.पी.सावंत हे आहेत. तर सदस्य म्हणून संचालक प्रविण देशमुख, सदस्या उपनगराध्यक्षा डाँ.पल्लवी लंगडे यांची निवड करण्यात आली.

महाविद्यालय विकास समितीवर दोघांची निवड झाल्याबद्दल भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके,उपाध्यक्ष प्रा.कैलास दाड,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजु शेटे,माजी नगराध्यक्ष नासेर खाँन पठाण,रेखाताई काकडे,नगरसेवक पप्पु बेग,मुसबीर खतीब,नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायख,डाँ. विशाल लंगडे, गोविंद सिनगारे, व्यंकटराव साखरे,व्यंकटी राऊत,छत्रपती कानोडे,सोनाजी सरोदे,बबन लोखंडे, नवनाथ बारसे,नगरसेवक गाजी काजी,पंडितराव लंगडे,पंडितराव शेटे,गोपाळ पंडित,पत्रकार गुणवंत विरकर, लक्ष्मीकांत मुळे,गजानन मेटकर,संदिप राऊत,बाबुराव जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: