Nanded Marathi News

अर्धापूर;मुसळधार पावसाने ज्वारी,कापूस व फुलशेतीचे प्रचंड नुकसान

अर्धापूर ( शेख जुबेर ) तालुक्यातीलअर्धापूर ,दाभड, मालेगाव मंडळांतील काही भागात मुसळधार पाऊस दि. १४ रोजी सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान पडला यावेळी जोराचा वारा व पावसामुळे ज्वारी,कापूस,ऊस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ज्वारी, ऊस पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास वारे व पावसाने हिसकावून घेतला.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने सोयाबीन ,हळद, केळी आदी पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

लॉकडाऊन काळात बाजारपेठ बंद असल्याने फुल विक्री होत नव्हती कसाबसा खर्च करून फुल शेती जगवली आणि सध्या फुलांना चांगला भाव येत होता मात्र या दोन दिवसांमध्ये चालू असलेल्या पावसामुळे फुलांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे अर्धापूर तालुक्यातील झेंडू, शेवंती, गलांडा , गुलाब आदी फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

दाभड परिसरातील सुभाषराव टेकाळे यांच्या शेतातील ज्वारी पीक जमीनदोस्त झाले

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: