Nanded Marathi News National News

नांदेड:325 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी’255 बाधितांची भर तर नऊ जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 16 :- बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 325 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 255 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 110 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 145 बाधित आले.

आजच्या एकुण 918 अहवालापैकी  617 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 12  हजार 437 एवढी झाली असून यातील 8  हजार 234 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 810 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकुण 9 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे रविवार 13 सप्टेंबर रोजी साखोजीनगर नांदेड येथील 52 वर्षाचा एक पुरुष, सोमवार 14 सप्टेंबर रोजी चिवळी मुखेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बसवंतनगर नांदेड येथील 24 वर्षाची एका महिलेचा, बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा, मंगळवार 15 सप्टेंबर रोजी धानोरा ता. धर्माबाद येथील 55 वर्षाची एक महिला, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राधिकानगर नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल वजिराबाद नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 16 सप्टेंबर रोजी धानोरा ता. नायगाव येथील 70 वर्षाची एक महिला, गोकुंदा किनवट येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे.  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 330 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 1, किनवट कोविड केंअर सेंटर 6, लोहा कोविड केंअर सेंटर 28, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 7, माहूर कोविड केंअर सेंटर 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, खाजगी रुग्णालय 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 9, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 182, कंधार कोविड केंअर सेंटर 20, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 6, नायगाव कोविड केंअर सेंटर 8, बिलोली कोविड केंअर सेंटर 23 असे 325 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 63, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 11, कंधार तालुक्यात 5, किनवट तालुक्यात 3, धर्माबाद तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, हिंगोली 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 4, भोकर तालुक्यात 2, देगलूर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 1, उमरी तालुक्यात 9, परभणी 1, यवतमाळ 1, लोहा तालुक्यात 1 असे एकुण 110 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 57,  हदगाव तालुक्यात 9, अर्धापूर तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 12, बिलोली तालुक्यात 4, मुखेड तालुक्यात 17, धर्माबाद तालुक्यात 7, उमरी तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 10, मुदखेड तालुक्यात 4, लोहा तालुक्यात 5, कंधार तालुक्यात 5, भोकर तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 2, हिंगोली 1 एकुण 145 बाधित आढळले

जिल्ह्यात 3 हजार 810 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 309, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 725, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 26, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 140, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 86, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 167,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 67, लोहा कोविड केअर सेंटर येथे 116, हदगाव कोविड केअर सेंटर 56, भोकर कोविड केअर सेंटर 29, कंधार कोविड केअर सेंटर येथे 50,  आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 50, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 40, मुदखेड कोविड केअर सेटर 60,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 16, किनवट कोविड केअर सेंटर येथे 228, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 52, उमरी कोविड केअर सेंटर 80, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 16, बारड कोविड केअर सेंटर 22, खाजगी रुग्णालयात 390 बाधित, औरंगाबाद 1 व निजामाबाद 1  संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 67 हजार 685,

निगेटिव्ह स्वॅब- 52 हजार 224,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 255,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 437,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 24,

एकूण मृत्यू संख्या- 330,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 8 हजार 234,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 810,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 54, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 68.37 टक्के 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: