National News

रेल्वेच्या मावेजाच्या निवाड्यावर आक्षपा ंचा पाऊस, गुणांक दोन मिळण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर भिस्त.

रेल्वेच्या मावेजाच्या निवाड्यावर आक्षपांचा पाऊस, गुणांक दोन मिळण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर भिस्त.

अर्धापूर ( शेख जुबेर )प्रस्तावित नांदेड -वर्धा यवतमाळ रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीसाठी निवाडा मंजूर झाला आहे.या निवाड्या प्रमाणे संपादित जमिनीसाठी गुणांक एक प्रमाणे मावेजा मिळत असून अंतिम नोटीस शेतक-यांना देण्यात आल्या आहेत.या नोटीसांवर अक्षपांचा पाऊस पडला आहे.सुमारे 75 टक्के शेतक-यांनी विविध कारणावरून आक्षेप नोंदविले आहेत.तर संपादितजमिनीसाठी गुणांक दोन प्रमाणे मावेजा मिळावा ही शेतक-यांची मागणी आहे.या मागणीची सर्व भिस्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर असून या संबंधी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

अर्धापूर तालुक्यातून नांदेड -यवतमाळ – वर्धा हा रेल्वे मार्गा जात आहे.यासाठी भूसंपादनाचीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.अर्धापूर शिवारातील जमिनीसाठी गुणांक एक प्रमाणे निवडा मंजूर झाला आहे.या निवाड्या प्रमाणे मावेजासाठीची अंतिम नोटीस शेतक-यांना देण्यात आल्या आहेत.या नोटीसांवर असंख्य चुका झाल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी असून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अक्षपांचा पाऊस पडला आहे

जमिन एकची नाव दुस-यांचे,नावात चुका, शेतीवरील हक्काचा दावा असे एक ना अनेक चुका झाल्या आहेत.चुकांबद्दल तक्रार करून ही त्यांची दखल घेण्यात आली नाही आशा तक्रारी शेतकरी करित आहेत.तसेच देण्यात आलेल्या मावेजा बद्दल निषेध व्यक्त करून व न्यायालयात दाद मागण्याचा हक्क अबाधित ठेवून रक्कम उचलण्यात येत आहे असे पत्र देवून रक्कम शेतकरी उचलण्यासाठी तयार होत आहेत.

संपादित जमिनीसाठी गुणांक दोन प्रमाणे मावेजा देण्यात यावा अशी शेतक-यांची मागणी आहे.या मागणीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याच्याकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आले.पण गुणांक एक प्रमाणे मावेजा देण्यात येते आहे.त्यामुळे शेतक-यांत तीव्र संताप असून आपल्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत .गुणांक दोन प्रमाणे मावेजा मिळविण्याची सर्व भिस्त पालकमंत्र्यावर आहे.या मागणी संबंधी शेतकरी,प्रशासकीय अधिकारी व पालकमंत्री यांची संयुक्त बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आसल्याची विश्वनिय सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

एकाच कुटूंबातील शेतीला दोन भाव :

अर्धापूर शिवारातील जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी व रेल्वेमार्गासाठी संपादित करण्यात येत आहेत.दोन्ही जमिनी एकाच शिवारातील आहेत.एकाच शेतकरी कुटूंबातील शेती संपादित करित आसतांना ज्यांचे शेत राष्ट्रीय महामार्ग संपादित करण्यात येत आहे त्या शेतीला जादा भाव तर त्याच कुटुंबातील रेल्वेच्या मार्गासाठी संपादित जमिनीसाठी कमी भाव कसा मिळतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: