Nanded Marathi News

नांदेड़:असनापुलावरील वाहतुक कोंडीकडे प्रशासन लक्ष देणार का…?

वाहतुककोंडीमुळे प्रवाश्यांना नाहक त्रास…

वाहतूकीसाठी बंद आसलेल्या पुलावरून प्रवाशांनी केला जीवघेणा प्रवास…

अर्धापुर ( शेख जुबेर )दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे.असना पुलावरील वाहतुककोंडीकडे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल प्रवाशी वर्गातुन निघत आहे…
नांदेड-नागपुर माहामार्गावरील असना पुलावर नेहमिच अवजड वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांपासापासुन हा प्रकार नित्याचाच होत आहे. पुलाच्या परिसरात ट्रक फेल झाला, मोठ-मोठे यंत्र;साहित्यांची वाहतूक करतांना,पुलावर अपघात झाला,गाडी फेल झाली की यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने अन्य वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दि.१४ सप्टेंबर सोमवार रोजी या पुलावर सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.अनेक प्रवाशांनी बंद करण्यात आलेल्या जुन्या पुलावरून केला जीवघेणा प्रवास.यामध्ये शासकिय कार्मचारी,व्यापारी व रूग्णांची चांगलीच तारांबर उडाली तर अनेकांना दोन ते तिन कि.मी.अंतर पाई चालत पार करावे लागले.यावेळी रस्त्यावर वाहनांच्या दोन ते तीन कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या नेहमीच होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवासी व विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
नांदेड शहरामधुन नागपुर,भोकर,म्हैसा,हिंगोली,जालना,औरंगाबाद,हैद्राबाद,निजामाबाद,लातुर,सोलापुर,अश्या मोठ्या शहरांना हा रस्ता जात आहे.वारंवार वाहतुकीची कोंडी (ट्रापीक जाम) होण्याचे प्रकार घडत आहेत.असना पुलावर दुहेरी वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे व असना नदीवरील जुना पुल बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.शहरामधुन जाणारा महामार्ग असुन आनेक मोठी बाजारपेठ आसलेले शहरे या महामार्गाला जोडले गेले आहे. त्यातच महत्त्वाची शासकीय कार्यालयास या मार्गाने वाहतुक होत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु असते.

■ या वेळेत होते सर्वाधिक कोंडी,

सकाळी व सायंकाळी वाहतुक जास्त असते.याच काळात शासकीय कार्यालयातील कर्मचारीही बाहेत पडतात. परिणामी रस्त्यांवर वाहनांची गर्दी होते. तासंतास वाहनांची कोंडी कायम राहत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत.

आसना पुलावरील वाहतुक कोंडीची समस्या कधी सुटेल?

असना पुलावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटेल,खड्डे असलेल्या या रस्त्यावर दुपारी व सायंकाळी गेल्या पाच दिवसापासून सतत वाहतूक कोंडी होते. एखादे जड वाहन रस्त्यावर आले तर अर्धातासांची निश्‍चित होत असुन याचा नाहक त्रस्त होत आहे.असना नदीवरील जुना पुल छोट्या वाहणांसाठी सुरू करावा..
– मदन कल्याणकर
भोकर वि.स.अध्यक्ष युवक काँग्रेस

छायाचित्रात,

१) असना नदीच्या छोट्या बंधा-यावरून आनेकांनी केला जिवघेणा प्रवास…

२) वाहणांच्या लागल्या रांगा…

♨️Join Our Whatsapp 🪀 Group For Latest News on WhatsApp 🪀 ➡️Click here to Join♨️

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: