NANDED NEWS IN HINDI

किनवट: उपविभाग किनवट अंतर्गत 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; देहली तांडा (ता. किनवट ) व वडसा ( ता. माहूर ) ही गावे कंटेनमेंटझोन जाहीर

-सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

किनवट / तालुका प्रतिनिधी :
उपविभाग किनवट अंतर्गत दोन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. देहलीतांडा व वडसा ही रुग्णांची गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

माहूर येथील कोविड हेल्थ केअर सेंटरच्या वतीने दि. २२ मे रोजी पाच स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. दि. २४ मे रोजी तपासणी अहवाल आले.त्यापैकी चार अहवाल निगेटिव्ह आले असून माहूर तालुक्यातील वडसा येथील १७ वर्षीय पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तसेच उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा ( किनवट ) येथील कोविड हेल्थ केअर सेंटरच्या वतीने दि. २३ मे रोजी तीन स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. दि. २४ मे रोजी तपासणी अहवाल आले. त्यापैकी दोन अहवाल निगेटिव्ह आले असून किनवट तालुक्यातील देहलीतांडा येथील २९ वर्षीय पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची पडसा गावास भेट.
निवासासाठी परजिल्ह्यातून आलेली व्यक्ती कोरोना रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे . त्याअर्थी अभिनव गोयल ( भ्रा.प्र.से. ) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा Incident Commander उपविभाग किनवट जि.नांदेड यांनी संपुर्ण दहेली तांडा ( ता. किनवट ) व वडसा ( ता. माहूर ) ही गावे Contalnment Area म्हणुन घोषीत केली आहेत व दहेली हे बफर झोन म्हणुन घोषीत केले आहे . तसेच Containment Zone च्या संपुर्ण परीसरात कलम १४४ लागु करण्यात आले आहे . दहेली तांडा व वडसा गावाच्या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही . तसेच गावातील दुकाने पुर्णपणे बंद राहतील . तसेच उपरोक्त प्रमाणे घोषीत केलेल्या Containment Zone मध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशिलवार धोरण व करावयाचे उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आले असून , त्याबाबत आरोग्य विभागाने सुध्दा प्रमाणित कार्यपध्दती ( SOP ) जाहीर केलेली आहे . त्या अनुषंगाने सदर Containment Zone मध्ये विविध उपाययोजना व नियोजन संबंधित विभागाने करावी . Containment Area मध्ये पुर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदरचे क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमित करण्यात बंदी असेल , अत्यावश्यक सेवा जसे किराणा साहित्य व भाजीपाला , दवाखाना / मेडीकल यांची आवश्यकता असल्यास ग्रामपंचायत / आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणी प्रमाणे सशुल्क करण्यात येईल , Containment Area मधील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारीत वेळेत पुर्ण करणेसाठी डॉ. संदीप जाधव यांचे वैदयकीय पथक नियुक्ती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी नियुक्त केले आहे. सदर क्षेत्राच्या चेक पोस्ट प्रवेश व निर्गमन ठिकाणावर आरोग्य विभागातील पथकाव्दारे तपासणी करण्यात येणार आहे.कोरोना विषाणु ( कोव्हीड -१ ९ ) लागन रुग्णाचे संपर्कात आलेल्या सहवासित व्यक्तींचा तात्काळ शोध घेणे आणि वैद्यकीय पथकाने निर्देशाप्रमाणे गृह विलगीकरणासह,संस्थात्मक विलगीकरण करुन इतर वैदयकीय कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. . ज्यांना गृह विलगीकरण केलेले आहे त्या व्यक्तीचा वैदयकीय अहवाल येईपर्यंत नियमित पाठपुरावा करण्यात यावा .संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे उपरोक्त परीसरांची संपुर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा असेही निर्देश सर्व सबंधित यंत्रणेला दिले आहेत.
या रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

किनवट : बाधित रुग्ण गाव दहेलीतांडा येथे सहायक जिल्हाधिकारी, तहसिलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.
तहसिलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी रुग्ण बाधित गावाला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: