MAHARASHTRA NEWS

BREAKING :महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबई 11 एप्रिल : महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहेत ही चिंतेची बाब असली तरी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 33 हजार तर मुंबईत 19 हजार चाचण्या झाल्या आहेत. यातल्या 60 ते 70 टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांची संख्या जास्त आहे अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शक्यतोवर घराबाहेर पडूच नका आणि काही कामांसाठी बाहेर पडलात तर मास्क बांधा आणि काळजी घ्या. 5 मेरोजी महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडून 5 आठवडे होतील. पण हा आकडा आपल्याला शुन्यावर आणायचा आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणं नाहीत असेही रुग्ण सापडत आहेत.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: