अर्धापुर(शेख जुबैर)नांदेड ते अर्धापुर रोडवर इंडियन ढाब्याजवळ टेम्पो व मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकल वरील दोघांचीही मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

नांदेड कडून अर्धापुर कडे जाणारा    ४०७ टेम्पो क्र एम एच २२- १६३७ व अर्धापुर कडून नांदेडकडे जाणारी मोटार सायकल क्र एम एच १९-ए बी-२५१९ यांच्यात इंडियन ढाब्याजवळ  समोरासमोर धडक झाल्याची माहिती वसमत फाटा महामार्ग पोलीसांना मिळताच तेथील प्रभारी अधिकारी शेख रहेमान,फौजदार बसवंते, पोलीस कर्मचारी करडेवाड, शेख एकबाल, वामन कोकाटे, इर्शाद बेग, रामदास केंद्रे, नरेश यादव, रामा जाधव, श्रीराम कदम, दत्ता डुकरे, व वसंत शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मोटार सायकल वरील पुजा बाबू पवार वय २६ हिचा जागीच मृत्यू झाला तर मोटार सायकल चालक छोटू उर्फ संदिप पैठणे यास जखमी अवस्थेत  नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.पुढील सोपस्कर पुर्ण करण्याची प्रक्रिया सुरु होती.